Republic Day Photos: पंढरपूरच्या विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात ७५० किलो फुलांची तिरंगी सजावट
देशाच्या प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून श्री क्षेत्र पंढरपूर येथील श्री विठ्ठल-रुक्मिणी मातेला तिरंगी फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली आहे. झेंडू, शेवंती व कामिनी या फुलांनी श्री विठ्ठल-रुक्मिणी मातेचा गाभारा सजवण्यात आला आहे. पंढरपूर येथील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती विविध सण, उत्सव, स्वातंत्र दिन अशा महत्त्वाच्या दिवशी देवाला विशेषरित्या सजवण्यात येते.